“ हावं , ना यार , पण आपूण काय करू शकतो . इथून बाहेर पडा य ला काही चान्स चं नाही ना ! ” सुलभाने नकारात्मक सुस्कारा सोडला, ., “का वं काय झालं तुला , काऊन असं आंबट तोंड आणि लांबट थोबाड झालायं तुह्यावालं ?” मी मस्करीत तिला विचारलं. “अरे कॉलेज संपल्या-संपल्या जॉब लागायला पाहिजे यार , नाहीतर कंपन्याच्या दारोदार भनाभणा फिरावं लागलं आपल्याला , मलं नाही वाटत आपल्या कॉलेज मध्ये कायं होईल आपलं" "अरे यांयला कायं घेण-देण नाही वं पोरांच्या भवितव्याच , यांना फीस भेटतीयेणा आपली , बाकी जॉबचं तुम्ही तुमचं पहून घ्या.” “आणि वरतून ऑटोनोमस म्हंटलं तर मग कल्यानचं झालं . ” “ हे पहायं एक रस्ता हाई , आ पू ण जर ऑफ कॅम्पस किंवा कॅम्पस इंटरव्यू दे ले , तरचं आपल्याला जॉब मिळ नार हे .” “ हाव ना , पण औरंगाबाद मध्ये कुठे कॅम्पस इंटरव्यू येत नाही , आले तर जातोच ना आपण , आता मागे एमजीएम कॉलेजला गेलो होतो ना , पण म्हणते काय तर पुण्यात जा. तुम च्या बाकी फेर्या पुण्यात हो त्यानं , तिथं पुन्हा फेर्यांची ...